Close

ड्राय व्हेजिटेबल मंचुरिअन (Dry Vegetable Manchurian)


साहित्य : मंचुरिअन बॉल्ससाठी : 1 कप किसलेला कोबी, अर्धा कप किसलेले गाजर, 5-6 बारीक चिरलेल्या फरसबीच्या शेंगा, पाऊण कप बारीक चिरलेल्या कांद्याच्या पाती, अर्धा कप बारीक चिरलेली सिमला मिरची, 3 टेबलस्पून कॉर्नस्टार्च, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
मंचुरिअन सॉससाठी : 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा टेबलस्पून आल्याची पेस्ट, 4-5 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च (पाव कप पाण्यात घोळून), 2 टीस्पून तेल, 2 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून साखर, स्वादानुसार मीठ.
कृती : मंचुरिअन बॉल्ससाठीचे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून त्याचे लहान-लहान गोळे तयार करून घ्या. हे बॉल्स
गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, लसूण व आल्याची पेस्ट घालून परतवा. नंतर त्यात साखर, सोया सॉस व थोडे पाणी घालून परतवा. त्यात कॉर्नस्टार्चचे मिश्रण एकत्र करा. आवश्यकता वाटल्यास आणखी थोडे कॉर्नस्टार्च घाला. त्यात मीठ व व्हिनेगर एकत्र करा. नंतर मंचुरिअन बॉल्स घालून पाणी पूर्णतः सुकेपर्यंत शिजवा. ड्राय मंचुरिअन कांद्याच्या पातीच्या चकत्यांनी सजवा.

Share this article