Close

मालदीवने भारतावर केलेल्या वर्णभेदी टिपण्णीवर भडकला अक्षय कुमार, स्वदेशी पर्यटनाला चालना देण्याचे आवाहन (Akshay Kumar lashes out at Maldives’ racist remarks against India)

लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांवरून सुरू असलेल्या वादावर, सिनेस्टार सलमान खान, अक्षय कुमार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या प्रमुख व्यक्तींनी लोकांना पर्यटनासाठी बाहेर न जाता देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे आवाहन केले.

मालदीव सरकारच्या द्वेषपूर्ण कमेंटनंतर बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारने आपलं मत व्यक्त केलं आहे. अक्षय कुमारने ट्विटमध्ये लिहिले की, “मालदीवमधील एका नेत्याने भारतीय लोकांबद्दल काही द्वेषपूर्ण आणि जातीयवादी टिप्पणी केली आहे. त्यांना सर्वाधिक पर्यटक पाठवणाऱ्या देशाबद्दलच ते असे बोलतात हे ऐकून आश्चर्य वाटते. शेजाऱ्यांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, पण विनाकारण द्वेष कसा सहन करायचा? मी अनेकदा मालदीवला गेलो. तिथल्या सौंदर्याची नेहमीच प्रशंसा केली आहे, परंतु आता माझ्यासाठी देशाचा स्वाभिमान प्रथम आहे. आता आपण भारतीय बेटांना भेट देण्याचा आणि आपल्या पर्यटनाला पाठिंबा देण्याचे ठरवू.”

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांची काही छायाचित्रे समोर आली. यानंतर लोक लक्षद्वीपला एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानू लागले. मालदीवचे मंत्री अब्दुल्ला महझूम मजीद यावर खूश नाहीत आणि त्यांनी एक पोस्ट शेअर करताना भारत आम्हाला टार्गेट करत असल्याचे म्हटले आहे.

पर्यटनाच्या बाबतीत मालदीवशी स्पर्धा करण्यासाठी भारताला कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मालदीवच्या प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवचे नेते झाहिद रमीझ यांनीही यावर भाष्य केले. त्याने लिहिले, “चांगले पाऊल, पण आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. ते आमच्या सेवांचा सामना कसा करू शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? त्यांच्यासाठी खोल्यांमधून येणारा वास ही सर्वात मोठी समस्या आहे.”

Share this article