साहित्य : प्रत्येकी अर्धा वाटी बारीक चिरलेला कोबी, फ्लॉवर, गाजर, मशरूम्स, टोफू, कांदा व कांद्याची पात, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, 1 टेबलस्पून बारीक चिरलेले आले, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 2 टेबलस्पून डार्क
सोया सॉस, 1 टीस्पून स्वीट चिली सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस किंवा केचप, 1 टीस्पून चिली सॉस, 1 टीस्पून शेजवान सॉस, 4 कप व्हेजिटेबल स्टॉक, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ
कृती : तेलावर कांदा परतून घ्या. त्यात लगेच लसूण व आले घालून परतवा. नंतर त्यात गाजर, कोबी व फ्लॉवर घालून परतवा. त्यात व्हेजिटेबल स्टॉक घालून सर्व सॉस घाला. स्वादानुसार मीठ व आवश्यकता असल्यास आणखी सॉसेस घाला. उकळी आल्यानंतर कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून, हे मिश्रण सूपमध्ये घाला. मिश्रण दाट झाल्यावर आच बंद करा. सूप कांद्याच्या पातीने सजवून गरमागरम सर्व्ह करा.
टीप : नॉन व्हेज सूप हवे असल्यास चिकन स्टॉक आणि
व्हेजिटेबल मंचाऊ सूप (Vegetable Manchow Soup)
Link Copied