Close

जन्मत: मुळचे हिंदू होते ए आर रहमान, या कारणाने स्विकारला इस्लाम (AR Rahman converted from Hinduism to Islam)

आपल्या जादुई संगीताने सर्व संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे ए आर रहमान. त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तम गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या नामांकित पुरस्काराने गौरवण्यात आलेले.  संगीतकार ए आर रहमान यांचा जन्म हिंदू म्हणून झाला होता. पण कालांतराने त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला.

एआर रहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबातच झाला. दिलीप कुमार हे त्यांचे खरे नाव होते. गायकाने १९८९ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. त्यांनी आपले नावही दिलीप कुमार बदलून रहमान केले. इस्लाम म्हणजे साधेपणाने जीवन जगणे असे गायकाचे मत.

रहमानने सांगितले होते की, त्यांचे वडील कर्करोगाने त्रस्त होते तेव्हा त्याच्यांवर शेवटच्या काळात एका सुफीने उपचार केले होते. काही वर्षांनंतर, जेव्हा ए.आर. रहमान सूफीला त्यांच्या कुटुंबासह भेटले, तेव्हा ते त्यांच्या बोलण्याने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी दुसरा धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

ते म्हणाले- एक सूफी होता जो मृत्यूपूर्वी माझ्या वडिलांवर उपचार करत होता. त्यांना पुन्हा भेटल्यावर, आम्ही आणखी एक आध्यात्मिक मार्ग स्वीकारला, ज्यामुळे आम्हाला खूप शांती मिळाली. एआर रहमानला त्याचे नाव दिलीप कुमार आवडत नव्हते. त्यांचे नाव त्यांच्या प्रतिमेशी जुळत नसल्याचे ते म्हणालेले.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Share this article