राजस्थानी भेळ
साहित्य : 1 कप शिजलेले काळे चणे, 1 कप बारीक कापलेला कांदा, टोमॅटो आणि कैरी, अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप अनारदाणे, अर्धा कप मसालेदार चणा डाळ, अर्धा कप पोह्यांचा चिवडा, पाव कप हिरवी चटणी, पाव कप चिंचेची चटणी, अर्ध्या लिंबाचा रस, 1 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ.
सजावटीसाठी : शेव आणि हिरवी चटणी.
कृती : काळे चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नंतर मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या. एका प्लेटमध्ये सर्वात आधी चणे पसरवा. यावर थोडासा चाट मसाला भुरभुरवा. यावर अनारदाणे टाका. पोह्यांचा चिवडा पसरवून मसालेदार चण्याची डाळ पसरवा. यावर कापलेला कांदा, टोमॅटो व कैरी टाका. लिंबाचा रस टाका. हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी हव्या त्या प्रमाणात टाकून वरून शेव आणि कापलेली कोथिंबीर टाकून सजवा आणि सर्व्ह करा.
राजस्थानी भेळ (Rajasthani Bhel)
Link Copied