जॉन अब्राहम अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये खूप गुंतवणूक करतो. मिळालेल्या माहितीनुसार जॉनने मुंबईतील एका पॉश भागात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. जॉनने खारच्या लिंकिंग रोड भागात एक घर विकत घेतले आहे, ज्याची किंमत 71 ते 75 कोटी रुपये आहे.
या आलिशान बंगल्याचे नाव 372 निर्मल भवन आहे, जो ग्राउंड प्लस दोन मजली आहे. असे सांगितले जाते की जॉनने 27 डिसेंबर रोजी 75 कोटी रुपयांचा करार केला होता आणि त्याने 4.25 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. जॉनची ही मालमत्ता 7,722 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे.
हा बंगला समुद्राच्या किनाऱ्यावर असून या भागात बॉलिवूडचे मोठे स्टार्स आणि बिझनेस टायकून राहतात. प्रीती झिंटा आणि आमिर खान यांचे घरही याच भागात आहे.
जॉन एक भव्य जीवनशैली जगतो. त्यांचा वांद्रे येथील समुद्र किनाऱ्यावर एक बंगलाही आहे, जो 4 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. त्याच्याकडे कोटय़वधीच्या कार आणि मुंबईच्या खार भागात कोटय़वधींचे कार्यालय आहे. याशिवाय परदेशातही त्यांची मालमत्ता आहे.
जॉन खेळातही गुंतवणूक करतो आणि तिथूनही चांगली कमाई करतो. पठाण चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेतही त्याला खूप पसंती मिळाली होती, त्यासाठी त्याने मोठी फी देखील घेतली होती.