पनीर गार्लिक कॉइन्स
साहित्य : 8-10 बर्गर ब्रेड.
चटणीसाठी : 2 टेबलस्पून बारीक चिरलेला वा कुटलेला लसूण, पाव कप बटर, 1 टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून कुटलेली लाल मिरची, मीठ.
सारणासाठी : 1 टेबलस्पून बटर, पाव टीस्पून हिंग, 3-4 पातीचा कांदा (बारीक चिरलेला), एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून लसूण पेस्ट, 2 टोमॅटो, अर्धा कप बारीक कापलेली कांद्याची पात, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 300 ग्रॅम पनीर (किसलेले), अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ.
कृती : लसूण, बटर, ओवा, काळी मिरी पावडर, लाल मिरची व मीठ एकत्र वाटून लसणाची चटणी करून घ्यावी. आता कढईत बटर गरम करून हिंगाची फोडणी द्या. यात पातीचा कांदा, कोथिंबीर टाका. लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ परतून घ्या.
आता बारीक कापलेला टोमॅटो शिजवून घ्या. कांद्याची पात, गरम मसाला आणि आलं-लसूण पेस्ट टाका. किसलेले पनीर आणि लिंबाचा रस टाकून हळूहळू परतून घ्या. मंद आचेवर थोडा वेळ शिजवा. बर्गर ब्रेडचे मधून दोन तुकडे करा. प्रत्येक भागावर तयार पनीरचे मिश्रण पसरवा. वरच्या भागाला लसूण चटणी लावा. हे बर्गर मायक्रोव्हेवमध्ये 250 सेल्सियस डिग्रीला 7-8 मिनिटे बेक करा.
पनीर गार्लिक कॉइन्स (Paneer Garlic Coins)
Link Copied