बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी ईशाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईशा तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे. नुकताच तिचा पती टिमी नारंगसोबत घटस्फोट झाला असून तिने पतीचे घर सोडले आहे. लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांचे नाते तुटले.
47 वर्षीय ईशा कोप्पीकरने 2009 मध्ये टिमी नारंगशी लग्न केले, तो व्यवसायाने हॉटेलियर आहे. लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघेही एका मुलीचे पालक झाले, तिचे नाव त्यांनी रियाना ठेवले. रियाना सध्या 9 वर्षांची आहे. पण लग्नाच्या 14 वर्षांनंतर आपण एकत्र राहू शकत नाहीत अशी या जोडप्याला जाणीव झाली, म्हणून ते वेगळे झाले.
काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांमध्ये सुसंगततेची समस्या असल्याचे बोलले जात होते. दोघांनीही लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु काही निष्पन्न झाले नाही, त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीनेच आपल्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेतली असून ती पतीचे घर सोडून वेगळी राहते आहे.
याबाबत अभिनेत्रीच्या बाजूने अद्याप कोणतीही पुष्टी आलेली नसली तरी माध्यमांशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, आता काही बोलायचे नाही. काहीही बोलणे खूप घाईचे आहे आणि मी सध्या त्याबद्दल बोलण्याच्या स्थितीत नाही. कृपया मला प्रायव्हर्सी द्या असे म्हटले.
ईशा कोप्पीकर आणि टिमी नारंग यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली आणि काही भेटीनंतर ते प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांना तीन वर्षे डेट केले, त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ईशाने स्वतःला अभिनयापासून दूर केले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 2019 मध्ये, तिने राजकारणातही प्रवेश केला आणि महिला वाहतूक शाखेच्या S BJP अध्यक्षा म्हणून काम करु लागली. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ईशाने कृष्णा कॉटेज, डॉन, क्या कूल हैं हम, फिजा, 36 चायना टाउन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटही केले आहेत.