Close

ख्रिसमसच्या मुहूर्तावर स्वराने शेयर केला लाडक्या राबियाचा फोटो! (Swara Bhasker-Fahad Ahmad Daughter Raabiyaa)

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा ही नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि प्रतिक्रियांसाठी ओळखली जाते. ती तिच्या स्वभावामुळे लाईमलाईटमध्ये असणारी सेलिब्रेटी आहे. आता स्वरानं तिच्या लाडक्या लेकीचा राबियाचा फोटो शेयर केला आहे. स्वरानं यापूर्वी देखील तिच्या लेकीचा राबियाचा फोटो शेयर करुन चाहत्यांना आगळं वेगळं सरप्राईज दिलं होतं. याच वर्षी सप्टेंबरमध्ये स्वरानं लेकीला जन्म देत गुड न्यूज दिली होती.

स्वरानं एका राजकीय पक्षात सक्रिय असणारा नेता फहाद अहमद याच्याशी लग्न करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. यावरुन तिला काही प्रमाणात ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. आता स्वरानं नाताळाच्या निमित्तानं शेयर केलेली पोस्ट ही चर्चेत आली आहे.

स्वराच्या यापूर्वीच्या सोशल मीडियावरील फोटोंनी नेटकऱ्यांना जिंकून घेतले होते. आपल्या वेगळ्या आणि परखड प्रतिक्रियांसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वराच्या लग्नाच्यावेळी तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा तिनं ट्रोल करणाऱ्यांना देखील चांगलेच सुनावले होते. आताच्या पोस्टनं नेटकऱ्यांनी मात्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

स्वरानं ती पोस्ट करताना चाहत्यांना, नेटकऱ्यांना देखील नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात काहींनी स्वराच्या त्या पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, स्वरा आणि तुझ्या लाडक्या लेकीला नाताळाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. किती सुंदर फोटो काढला आहे तुम्ही. तुम्ही नेहमीच असेच हसत खेळत राहा. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राबियाचे कौतुक केलं आहे.

वीरा दे व्हेडिंग, तनु वेड्स मनु, रांझणा सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा परिचय स्वरानं करुन दिला आहे. ती नेहमीच तिच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे चर्चेत राहिली आहे.

Share this article