Close

गजनी सिनेमाला १५ वर्ष पूर्ण, असीन नाही तर ही अभिनेत्री होती मेकर्सची पहिली पसंती (15 years of Ghajini priyanka chopra is first choice of makers instead of asin)

बॉलिवूडमध्ये कोणता सिनेमा किती कमाई करतो. त्याची एण्ट्री कोणत्या क्लबमध्ये जाते यासर्व गोष्टी फार महत्वाच्या मानल्या जातात. सध्या १०० कोटी क्लब, ३०० कोटी क्लब, ५०० कोटी क्लब यांसारख्या बॉक्स ऑफिसवर क्लबची फार चलती आहे. पण यासर्व प्रकारची सुरुवात आमिर खानच्या गजनी या सिनेमाने केली होती. या सिनेमाला काल १५ वर्ष पूर्ण झाली.

या सिनेमात आमिर खानसोबत साऊथकडील लोकप्रिय अभिनेत्री असिनदेखील दिसलेली. सिनेमाचा नायकच त्या सिनेमाचा व्हिलन कसा बनतो अशी आगळीवेगळी कथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली.

गजनी हा भारतातील U/A सर्टिफिकेट मिळालेला पहिला सिनेमा होता. त्यातील हिंसाचारी दृष्यांमुळे त्याला हे सर्टिफिकेट मिळालेले. विशेष म्हणजे या सिनेमात एकही सेक्शुअल सीन नव्हता.

या सिनेमात आमिर खानची हेअर स्टाइल आणि त्याच्या शरीरावर गोंदवलेल्या गोष्टी फार चर्चेत आलेल्या. सिनेमासाठी अभिनेत्याच्या शरीरावर गोंदवण्यात आलेला फोन नंबर एका बंगलुरुमधील महिलेचा होता. सिनेमा पाहिल्यानंतर त्या नंबरवरुन तिला भरपूर फोन आणि मेसेज येऊ लागलेले.

तसेच सिनेमात कल्पना हे पात्र असिनने उत्तम प्रकारे साकारले असले तरी या मेकर्सची पहिली पसंती प्रियांका चोप्रा होती. मात्र आमिरनेच असीनचे नाव सुचवलेले. या सिनेमाचा क्लायमॅक्स आमिरने स्वत: पुन्हा एकदा लिहिलेला. त्यातील सीन्स, संवाद, लोकेशन, अक्शन यांसारख्या अनेक गोष्टी अभिनेत्यानेच लिहिलेल्या.

Share this article