कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या वर्षी फेब्रुवारीमध्ये विवाहबद्ध झाले आणि आता ते लग्नानंतर त्यांचा पहिला ख्रिसमस एकत्र साजरा करत आहेत. कियाराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती ख्रिसमसच्या सजावटीमध्ये सिद्धार्थसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
या रोमँटिक फोटोत कियाराने लाल रंगाचा मिनी ड्रेस घातला आहे आणि सिडने काळा शर्ट आणि लाल पँट घातली आहे. कियाराने सांता हेअरबँड घातला आहे. त्यांच्या पाठी ख्रिसमस ट्री आणि सजावट फारच सुरेख दिसत आहे.
सिद्धार्थने कियाराला आपल्या मिठीत घेतले आहे आणि कियारानेही सिद्धार्थच्या गळ्यात आपले हात ठेवले आहेत. सिड किआराच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत आहे.
हा रोमँटिक फोटो खूप वेगाने व्हायरल झाला. चाहते या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. या फोटोवर करण जोहरने कमेंट केली आहे. त्याने बरेच हार्ट इमोजी पोस्ट केले.. काहीजण या जोडीला सर्वोत्कृष्ट म्हणत आहेत तर काहीजण या जोडीला क्युटी म्हणत आहेत. कियाराला राजकन्या संबोधून लोक तिचे कौतुक करत आहेत. बरेच चाहते हार्ट आणि गोंडस इमोजी पोस्ट करून जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.
सिद्धार्थ डिजिटल डेब्यू करणार असून लवकरच तो रोहित शेट्टीच्या पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो योद्धा या चित्रपटातही दिसणार आहे.
कियारा हृतिक रोशनसोबत वॉरमध्ये दिसणार असून ती राम चरणसोबत गेम चेंजरमध्येही दिसणार आहे.