Close

व्हेज पोटली (Veg Potli)

व्हेज पोटली
साहित्य : 100 ग्रॅम कॉर्नफ्लोर, 50 ग्रॅम मैदा, अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप फ्लॉवर, अर्धा कप फरसबी, अर्धा कप गाजर, अर्धा कप पालक, पाव कप कांद्याची पात, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट, धणे पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, बांधण्यासाठी कांद्याची पात, तेल, चवीनुसार मीठ.
कृती : मैदा, कॉर्नफ्लोर आणि गव्हाचे पीठ एकत्र करून यात मीठ मिसळा आणि पीठ मळून घ्या. पालक सोडून इतर सर्व भाज्या बारीक कापून मीठ टाकून अर्धवट शिजवून घ्या. कढईत तेल गरम करून यात आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट टाका व परतून घ्या. यात धणे-जिरे पावडर, आमचूर पावडर व काळी मिरी पावडर टाका. यात शिजलेल्या भाज्या व पालक टाकून चांगले परतून घ्या. मीठ टाका व भाजी पूर्णतः सुकेपर्यंत परतून घ्या. पिठाचे छोटे छोटे गोळे करून हातावरच गोल पारी तयार करा. यात तयार भाजी भरून पुरचंडीचा आकार द्या. भरपूर चुण्या तयार करा आणि पुरचुंडी कांद्याच्या पातीने बांंधा. तयार पोटली तळून घ्या आणि सॉससह गरम गरम सर्व्ह करा.
टीप : याप्रमाणेच मांसाहारी खवय्यांसाठी खिमा पोटली तयार करता येते.

Share this article