गेल्या काही दिवसांपासून बच्चन परिवार बरेच चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वितुष्ट आल्याच्या, ऐश्वर्याने घर सोडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचंही सांगितलं जातंय. बच्चन कुटुंबियांबद्दल अशा प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच आता जया बच्चन आणि श्वेता यांच्या बद्दलही एक मोठी बातमी समोर आली आहे. तसं पाहायला गेलं तर जया आणि श्वेता दोघी मायलेकी स्वभावाने एकसारख्याच आहेत. दोघींनाही पर्सनल आयुष्य मीडियासमोर उघड करायला आवडतं नाही, त्यांना त्यांची प्रायव्हसी आवडते. पण पण एक वेळ अशी आली होती की जेव्हा जया यांनी श्वेताच्या थेट कानाखाली लगावली होती.
संतप्त जया बच्चन यांनी एकदा श्वेताच्या कानाखाली लगावली होती, असा खळबळजनक खुलासा एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने केला आहे. तो सेलिब्रिटी दुसरा -तिसरा कोणी नसून बच्चन कुटुंबियांचा निकटवर्तीय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर आहे. जया बच्चन यांनी श्वेताच्या कानाखाली लगावली, तेव्हा करण समोरच होता. पण त्यामागचं कारण वाचून तुम्हीही चकित व्हाल!
जया बच्चन या मीडियासमोर बऱ्याच वेळा रागात असतात, फोटोग्राफर्ससमोर पोझ देणे, हसणं, हे त्यांच्याकडून फारसं होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा काहीशी खडूस अशी आहे. त्यांना प्रायव्हेट लाईफ जपायला आवडतं, त्याप्रमाणेच श्वेतालाही पर्सनल आयुष्य लोकांसमोर फारसं मांडायला आवडतं नाही. जया आणि श्वेता या दोघीही एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा जया यांचं म्हणणं न ऐकल्याने श्वेताला मार मिळाला होता.
करण जोहरने केला खुलासा
दिग्दर्शक करण जोहर हा बच्चन कुटुंबियांच्या जवळचा आहे, त्यानेच या संदर्भात मोठा खुलासा केला. ‘फिल्मी मॅगझिन’ वाचल्यामुळे श्वेताला जया यांच्याकडून मार खावा लागल्याचे करणने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. ‘आम्ही जरी फिम्ली कुटुंबातले असलो तरीही आमचं बालपण इतरांसारखचं साधं गेलं, आम्हाला इतरांप्रमाणेच साधी वागणूक मिळेल, तसंच आयुष्य जगू याची आमची आई काळजी घ्यायची त्यामुळे आमच्यापैकी (सेलिब्रिटी किड्स) कोणालाही फिल्मी मॅगझिन वाचण्याची परवानगी नव्हती. पण मीच कधीतरी ‘सिनेब्लिट्झ’ आणि ‘स्टारडस्ट’ चोरून वाचायचा प्रयत्न करायचो. एके दिवशी श्वेता (बच्चन) देखील माझ्यासोबत ते मॅगझीन वाचत होती आणि ते नेमकं जया आंटींनी पाहिलं. त्या एवढ्या संतापल्या की त्यांनी श्वेताला माझ्यासमोरच थेट कानाखाली लगावली ‘ असा किस्सा करणने सांगितला.