ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना त्यांच्या वाढत्या वयाशी संबंधित काही समस्या होत्या, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खालावल्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होत्या. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. १९५० मध्ये आलेल्या 'हमारी बेटी' या सिनेमातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. पुढे अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी मोठा पडदा गाजवला. तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रविवारी १७ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १८ डिसेंबर रोजी रात्री डिस्चार्ज देण्यात आला.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, तनुजा यांचे हेल्थ पॅरामीटर सामान्य होते, त्यानंतर सोमवारी रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.