विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय हे २००० मधले सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. मात्र काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. आता, एका मुलाखतीत विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय यांनी मुलाच्या भूतकाळाबद्दल काही गोष्टी सांगितल्या.
सुरेश ओबेरॉय यांनी विवेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, 'बहुतेक गोष्टी मला माहितही नव्हत्या. विवेकने मला कधीच त्या सांगितल्या नाहीत. राम गोपाल वर्मा यांनी मला त्या सांगितल्या मग मी विवेकला समजावलं. असं करु नकोस म्हणून इशारा दिलेला.
विवेकचा भूतकाळ अमिताभ यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत होता, त्यामुळे अनेकांना असेही वाटते की अमिताभ आणि सुरेश यांच्यात चांगले संबंध चांगले नाहीत. पण सुरेश म्हणाले की, ते आणि अमिताभ बच्चन कधीच मित्र नव्हते, तर एकमेकांचे समर्थक होते.
विवेकने ऐश्वर्या रायला डेट केल्यामुळे सलमानने विवेकचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. सुरेश ओबेरॉयने सलमान खान आणि वडील सलीम खान यांच्याशी आपले नाते कसे होते याबद्दलही सांगितले. ते म्हणाले, 'त्यावेळीही मी विवेकाच्या बाबतीत फारसा विचार केला नाही. आम्ही सर्व एकमेकांशी खूप चांगले वागतो. सलमान खान जेव्हाही मला भेटतो तेव्हा तो माझ्याशी आदराने बोलतो.