गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यात मतभेद आणि घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत होत्या. अशातच ऐश्वर्याने बच्चन घर सोडून आईच्या घरी शिफ्ट झाल्याच्या बातम्यांनी आगीत आणखीच भर पडली.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर ऐश आणि अभिषेकमध्ये बऱ्याच दिवसांपासून मतभेद सुरू आहेत. इतकेच नाही तर ऐश आणि जया बच्चन यांच्यात अनेक वर्षांपासून कोणताही संवाद नसल्याचेही बोलले जात आहे अशातच ऐश्वर्या आपल्या लेकीसोबत वेगळी राहत असल्याचे बोलले जाते.
इव्हेंटमध्येही बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्या देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तसेच अभिषेकने त्याच्या लग्नाची अंगठीही काढल्याचे पाहायला मिळाले, हे जोडपे घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र ते एक हाय प्रोफाइल कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे थोडा अडथळा येऊ शकतो.
ऐश्वर्याने बच्चन घर सोडले आहे आणि ती आपल्या मुलीसह तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाली आहे, परंतु काल रात्री एका कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्याला एकत्र पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
इतकेच नाही तर या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि अगस्त्य नंदा देखील दिसले. हे सर्वजण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमाला पोहोचले होते.
आराध्याही येथे परफॉर्म करणार होती. व्हायरल व्हिडीओमध्ये एकीकडे आई वृंदासोबत ऐश कारमधून खाली उतरताना दिसत होती तर दुसरीकडे अभिषेक आणि अमिताभ दुसऱ्या कारमधून खाली उतरताना दिसत होते. अभिषेकला पाहून ऐशने एक स्माईल दिली, ती खूप आनंदी दिसत होती.
व्हिडिओ https://www.instagram.com/reel/C04fbrBq1Cb/?igshid=MzRlODBiNWFlZA==
ऐश्वर्याने अगस्त्याला गाल पकडून प्रेम व्यक्त केल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. बाहेर जाताना ती आणि अभिषेक तिच्या आईचा हात धरून तिला कारपर्यंत आणताना दिसले.
या सर्वांमध्ये, बरेच लोक अशी प्रतिक्रिया देखील देत आहेत की ते एकत्र दिसले तरीही त्यांच्यात बिनसले आहे आणि अगस्त्याने देखील ऐशकडे दुर्लक्ष केले, परंतु बहुतेक चाहते संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहून आनंदी आहेत.