चॉकलेट ट्रफल्स
साहित्य : 500 ग्रॅम चॉकलेट (डार्क चॉकलेट किंवा डार्क आणि मिल्क चॉकलेट मिक्स), 250 ग्रॅम क्रिम, कोको पावडर.
कृती : चॉकलेटचे तुकडे करा आणि मोठ्या बाऊलमध्ये ठेवा. मंद आचेवर क्रिम गरम करा आणि चॉकलेटमध्ये टाकून पाच मिनिटे मिश्रण तसेच ठेवा. हे मिश्रण अगदी मऊ होईपर्यंत एकजीव करा. रात्रभर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. आता मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा आणि कोको पावडरमध्ये घोळवून घ्या. चॉकलेट ट्रफल्स सर्व्ह करण्यास तयार.
Link Copied