प्राईम व्हिडिओने त्यांच्या ॲमेझोन ओरिजिनल मूव्ही ‘ड्राय डे’ ची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा ग्लोबल प्रिमियर येत्या २२ डिसेंबरला केला जाईल. हिंदीसह तमिळ, तेलुगु, मल्याळम् व कन्नड भाषेत हा चित्रपट दिसणार आहे. या सिनेमाचे कथानक देशाचे हृदय मानलेल्या राज्यातील एका गावात घडते. काही काळ गुंडगिरी करण्यात व दारूच्या आहारी गेलेल्या गन्नू या पात्राचा यंत्रणेविरुद्धचा प्रवास या कथानकात उलगडत जातो. तोही विनोदी पद्धतीने.
गन्नूची भूमिका जितेंद्र कुमारने साकारली असून त्याची नायिका श्रिया पिळगांवकर झाली आहे. त्यांच्या सोबत अन्नू कपूर आहे. मोनिषा अडवाणी, निखिल अडवाणी, मधू भोजवानी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ शुक्ला यांनी केले आहे. हा सिनेमा सामाजिक व्यंगावर खेळकर अंगाने, विनोदी पद्धतीने भाष्य करतो. दारुच्या व्यसनावर महत्त्वपूर्ण आणि समर्पक संदेश देतो, असे या ‘ड्राय डे’ च्या निमित्ताने इथे एंटरटेनमेंटचे निर्माते निखिल अडवाणी यांनी सांगितले.