Close

त्रिकोणी (Trikoni)

त्रिकोणी
साहित्य: ब्रेडचे 6-7 स्लाइस, 2 उकडलेले व मॅश केलेले बटाटे, 1 टीस्पून मोहरी,अर्धा टिस्पून उडीद डाळ, 8-10 कढीपत्ता, 1 टीस्पून चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून कोथिंबीर, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ.
कृती : तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ आणि कढीपत्ता घाला. आता बटाटे आणि इतर सर्व मसाल्यांचे पावडर आणि मीठ घालून चांगले मिसळा, थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा आणि ब्रेडच्या कडा कापून घ्या. प्रत्येक ब्रेड पाण्यात बुडवून पिळून घ्या. आता ब्रेड स्लाइसच्या मध्यभागी बटाट्याचे थोडेसे मिश्रण ठेवून त्रिकोणाच्या आकारात दुमडून घ्या. प्रत्येक ब्रेड स्लाइस त्याच प्रकारे भरा आणि त्रिकोणात दुमडून घ्या. गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा.

Share this article