शाहरुख खानचा आगामी डंकी 21 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी किंग खानसोबत त्याचे मॅनेजर आणि अंगरक्षकही होते.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नुकताच वैष्णोदेवीच्या दरबारात देवीच्या दर्शनासाठी गेला होता. वर्षभरात वैष्णोदेवीला भेट देण्याचीही अभिनेत्याची तिसरी वेळ आहे. प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वैष्णोदेवीला जाण्याचा नियम अभिनेत्याने बनवला आहे, असा अंदाज चाहते सध्या बांधत आहे.
https://x.com/PTI_News/status/1734418599819850117?s=20
पीटीआय न्यू एजन्सीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याच्या बॉडी गार्ड आणि मॅनेजरसोबत जम्मूमधील मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरून चालताना दिसतो.
याआधीही बरोबर वर्षभरापूर्वी 12 डिसेंबरला 'पठाण' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान वैष्णोदेवीला गेला होता. या अभिनेत्याने चार वर्षांनंतर 'पठाण' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली.
त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही किंग खान जवान चित्रपटाच्या रिलीजपूर्वी वैष्णोदेवीला गेला होता. आणि जवानने बॉक्स ऑफिसवरही खळबळ उडवून दिली आणि जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली. किंग खानचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट आणि हिंदी चित्रपटातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.
शाहरुख खानचा पुढचा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक राज कुमार हिरानी यांचा डंकी. हा चित्रपट 1000 कोटी रुपयांपर्यंत कमावण्याची शक्यता आहे. 21 डिसेंबरला डंकी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. आणि याच दिवशी प्रभासचा सालारही प्रदर्शित होत आहे.