Close

तृप्ती डिमरीच्या अॅनिमलमधील रोलवर सारा अली खानचा होता डोळा, पण दिग्दर्शकाला पंसत नाही आली पतौडींची राजकन्या (Sara Ali Khan Was Rejected For Triptii Dimri’s Role In Animal Movie)

आज सर्वत्र अॅनिमल या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाने जबरदस्त यश आणि कमाई केली. त्यातील प्रत्येक पात्र स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करु शकले.

रणबीर आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असूनही लोक बॉबी आणि तृप्ती डिमरीचे कौतुक करत आहेत. आजकाल तृप्तीला नॅशनल क्रश अशी उपमा दिली जात आहे. तृप्तीने झोयाच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे यात शंका नाही, पण तृप्तीच्या आधी सारा अली खानने या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती.

रिपोर्ट्सनुसार, सारा अली खानला चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आणि तिला ही भूमिका करायची होती, परंतु तिच्या ऑडिशनने संदीप रेड्डी वंगा यांना फारसे प्रभावित केले नाही. अशा धाडसी भूमिकेसाठी सारा तितकी प्रभावी ठरणार नाही, असे संदीपला वाटले. यानंतर त्यांना तृप्तीचे ऑडिशन खूप आवडले आणि ती फायनल झाली.

 तृप्ती आणि रणबीरचे अॅनिमलमध्ये खूप बोल्ड आणि इंटीमेट सीन्स आहेत, ज्यानंतर तृप्तीचे नाव सर्वांच्या ओठावर आले. सारा किंवा संदीपच्या बाजूने असे काहीही समोर आले नसले तरी साराने संदीपने फेटाळून लावल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

तृप्तीने ही भूमिका अतिशय चोख बजावली आहे यात शंका नाही. तृप्ती लैलाने मजनू, बुलबुल आणि काला यांसारख्या चित्रपटांतून तिची अभिनय क्षमता सिद्ध केली असून आता तिने अॅनिमलच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात प्रवेश केला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि 500 ​​कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

Share this article