Close

टोस्टीज् (Toasties)

टोस्टीज्
साहित्य : 1 बटाटा ( उकडलेला ), 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर मोहरी, 5 कढीपत्ता, 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली), चिमूटभर हळद, 2 ब्रेड स्लाइस, 30 ग्रॅम बटर, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार

कृती : बटाटे आणि मीठ मॅश करून त्यात कोथिंबीर घालून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागल्यावर त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हळद घाला. बटाट्याचे मिश्रण घालून थोडा वेळ परतून घ्या. आचेवरून काढून बाजूला ठेवा. आता दोन्ही ब्रेड स्लाइसवर बटर लावा. एकावर बटाट्याचे मिश्रण ठेवून दुसर्‍या ब्रेडने झाकून ठेवा. कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत टोस्ट किंवा ग्रील करा. मधोमध कापून गरम चहासोबत सर्व्ह करा.

Share this article