बिग बॉस 13 चे प्रसिद्ध जोडपे हिमांशी खुराना आणि असीम रियाझ वेगळे झाले आहेत. ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले,हिमांशीने स्वतः X वर एक पोस्ट शेअर करून ब्रेकअपची बातमी दिली आहे, आणि ब्रेकअपचे कारणही सांगितले आहे. या बातमीनंतर हिमांशी आणि असीमच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
हिमांशी खुराणा हिने तिच्या X हँडलवर असीम रियाझसोबतच्या ब्रेकअपची घोषणा करत अधिकृत विधान शेअर केले आहे आणि धार्मिक कारणांमुळे दोघांनी वेगळे झाल्याचे सांगितले. ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा देताना हिमांशीने लिहिले की, "होय, आम्ही आता एकत्र नाहीत. आम्ही एकत्र घालवलेला वेळ खूप चांगला होता, आम्ही फक्त इथपर्यंत एकत्र होतो. आमच्या नात्याचा प्रवास खूप छान होता, पण आता आमच्या जीवनात पुढे जात आहोत.. आम्ही दोघेही आपापल्या धर्माचा आदर करतो आणि वेगवेगळ्या धार्मिक समजुतींमुळे आमच्या प्रेमाचा त्याग करत आहोत. आमच्यात एकमेकांबद्दल द्वेष नाही .आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करा...हिमांशी."
यानंतर हिमांशीने आणखी एक पोस्ट शेअर करत लिहिले - "आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही उपाय शोधू शकलो नाही. आम्ही अजूनही एकमेकांवर प्रेम करतो, पण कदाचित नशीब साथ देत नाही. द्वेष नाही, फक्त प्रेम आहे, हा निर्णय योग्य आहे."
हिमांशीने एका सोशल पोस्टद्वारे ब्रेकअपची पुष्टी केली आहे. पण आत्तापर्यंत असीमने कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही किंवा त्यांनी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. या वृत्तावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
त्यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर हिमांशी आणि असीम 'बिग बॉस 13' च्या घरात पहिल्यांदा भेटले होते आणि दोघेही प्रेमात पडले होते. बिग बॉसच्या घरातच असीमने हिमांशीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. हिमांशीने तिच्या नऊ वर्षांच्या प्रियकराशी असीमसाठी ब्रेकअप केले होते. हिमांशी आणि असीम अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये एकत्र दिसले आहेत आणि त्यांचे कुटुंबीयही या नात्यामुळे खूश होते. चाहत्यांनीही त्यांना एक आदर्श जोडपे म्हणून पाहिले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हिमांशी आणि असीम रियाझच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत होत्या. असीम रियाझने गायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने या अफवांना उधाण आले होते. अखेर हिमांशीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता त्याचे चाहते आसिमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.