झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटाच्या प्रीमियरला हृतिक रोशन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पोहोचला. प्रीमियरला पोहोचलेले हृतिक आणि सबा दोघेही जबरदस्त स्टाइलमध्ये दिसले. पण सबाची अनोखी हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर नेटिझन्स मजेशीर कमेंट करत आहेत.
बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद अनेकदा रेड कार्पेटवर फिरताना दिसतात. हृतिक आणि सबा चित्रपट निर्मात्या झोया अख्तरच्या द आर्चीज चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचले होते.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने हँडसम हंक हृतिक रोशन डॅपर लूकमध्ये दिसला. या अभिनेत्याने साध्या काळ्या शर्टसह स्ट्रीप पॅन्ट घातली होती. सोबत टोपीही घातली होती.
दुसरीकडे, 38 वर्षीय अभिनेत्री सबा आझादने काळ्या रंगाच्या स्टिलेटोसह अतिशय सुंदर फ्लोरल प्रिंटेड मिडी स्कर्ट आणि मॅचिंग टॉप कॅरी केला होता. अभिनेत्रीने तिचा लूक नैसर्गिक ग्लॅमसह केला होता. या कार्यक्रमात पोहोचलेल्या सबाच्या अनोख्या हेअर स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून सोशल मीडियावर नेटिझन्सही तिची खिल्ली उडवत आहेत.
सबाने तिचे पुढचे केस लूपसारख्या स्टाईलने मागे दुमडले होते आणि मागून पोनी टेल बांधली होती. अभिनेत्रीची समोरची स्टाइल पाहून सोशल मीडिया यूजर्स तिला वाईट पद्धतीने ट्रोल करत आहेत. तिच्यावर मजेशीर कमेंट करत आहे. काही लोक तिला माकड म्हणत आहेत तर काही तिला कार्टून म्हणत आहेत.
सबाची तिच्या फॅशन आणि ड्रेस स्टाइलमुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही.