दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्या आपल्या तीन मुलांसह मुंबईत राहत होत्या. त्यांनी २८ नोव्हेंबर २०२३ रोजी अखेरचा श्वास घेतला. राजकुमार यांच्या पत्नीचे नाव गायत्री पंडित होते. २७ वर्षांपूर्वी राजकुमार यांनी या जगाचा निरोप घेतला होता. घशाच्या कर्करोगाने निधन झाले होते.
राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी दीर्घायुष्य हे कारण असल्याचे बोलले जात आहे. राजकुमार आणि गायत्री यांना पारू राज कुमार, पाणिनी राज कुमार आणि मुलगी वास्तविकता पंडित अशी तीन मुले आहेत.
राजकुमार यांचा चित्रपट प्रवास खूप खास होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते इन्स्पेक्टर होते पण त्यांनी पोलिसांची नोकरी सोडून मुंबईत अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली.
राज कुमार यांनी तिरंगा, सौदागर, मदर इंडिया, मरते दम तक, हिर रांझा यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेले.