Close

मसाला पुरी (Masala Puri)

मसाला पुरी


साहित्य: पुरीसाठी: 1 कप गव्हाचे पीठ,1/2 कप रवा,1 चमचा तूप, 1 वाटी मेथीची पाने, चवीनुसार मीठ, थोडी जिरेपूड. टॉपिंगसाठी: 100 ग्रॅम चणे (भाजलेले),100 ग्रॅम मटार, 100 ग्रॅम बटाटे (उकडलेले). एक चिमूटभर चाट मसाला,
1 टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट, 1 टीस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून लसूण चटणी.
कृती : पुरीसाठीचे सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्या आणि लहान पुर्‍या बनवून तळून घ्या.
टॉपिंगसाठी: एका भांड्यात चणे, वाटाणे, बटाटे, चाट मसाला, आले-मिरची पेस्ट, लिंबाचा रस आणि लसूण चटणी घाला. सर्व साहित्य नीट एकजीव करून बाजूला ठेवा. सर्व्ह करण्याची पद्धत: आता एका प्लेटमध्ये पुर्‍या ठेवा. त्यांच्यावर टॉपिंगचे मिश्रण ठेवा. वर थोडे भाजलेले चणे पसरवा आणि चाट मसाला शिंपडा. कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.

Share this article