बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या एनिमल या सिनेमासाठी चर्चेत आहे. त्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. रणबीरचा ये जवानी है दिवानी हा सिनेमा आजही लोकांना पसंत पडतो. २०१३ मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये पसंती मिळवतो.
ये जवानी है दिवानी या चित्रपटातील 'बदतमीज दिल' हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. पार्टी असो वा इतर कोणताही कार्यक्रम त्यात हे गाणे अनेकदा वाजवले जाते. मुंबईत 'एनिमल'च्या म्युझिक लाँचदरम्यानही रणबीर 'बदतमीज दिल'ची हुकस्टेप करताना दिसला.
डान्सनंतर रणबीर कपूरनेही चाहत्यांना मजेदार पद्धतीने विनंती केली. गाणे थांबताच रणबीर म्हणाला, 'एक गोष्ट सांगतो, हे गाणे २०१३ मध्ये रिलीज झाले होते. पण मी जिथे जातो तिथे हे गाणं माझं पाठलाग करत नाही. मी आता ४१ वर्षांचा आहे, माझ्याने आता हे होत नाही. माझी कंबर मोडते. मी आता सर्व इव्हेंट मॅनेजरना सांगणार आहे की, आतापासून हे गाणे वाजवू नका. माझे आता वय होत आहे त्यामुळे कोणतेही हळू गाणं वाजवा. रणबीर कपूरचे हे शब्द ऐकून कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व चाहते जोरजोरात हसू लागले.
सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी 'एनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना देखील आहे. याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. तर बॉबी देओल या सिनेमात एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे.