टेलिव्हिजनची लाडकी सून रुबिना दिलैक सध्या तिच्या गर्भधारणेच्या टप्प्याचा आनंद घेत आहे. 34 वर्षीय अभिनेत्री गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत आहे. ती कधीही बाळाला जन्म देऊ शकते. त्यामुळे रुबिनाला मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहतेही आतुर आहेत. मात्र आता भारती सिंगने याचा अंदाज वर्तवला असून रुबीनाला मुलगा होणार असल्याचे तिने म्हटले आहे.
भारती सिंहने नुकतेच रुबिना दिलीकसोबत एक व्लॉग शूट केला. शूटिंगदरम्यान दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला. यादरम्यान भारती सिंहने तिच्याबद्दल काही रंजक खुलासे केले. शूटिंगदरम्यान भारती म्हणाली, "रुबिना गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत खूप सक्रिय आहे. मी याबद्दल खूप आनंदी आहे. पण शूट संपले आहे, मी तिला घरी जाण्यास सांगत आहे, पण ती येथे ड्रॅगन फ्रूट, सफरचंद खात बसली आहे. तू घरी जा नाहीतर तुझे बाळ इथेच बाहेर येईल."
शूटिंगवरून घरी परतल्यानंतर भारतीने सांगितले की, रुबीनाला नक्कीच मुलगा होईल. "ती आज खूप सुंदर दिसत होती. मी गरोदर असताना आणि शूटिंग करताना सगळ्यांनी मला सांगितले की माझ्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे आणि आज जेव्हा मी रुबीला पाहिले तेव्हा देखील तिच्या चेहऱ्यावर ग्लो होता, म्हणून मी तिला सांगितले की तुला नक्कीच मुलगा होईल. जेव्हा मुलींचा जन्म होतो तेव्हा त्या पोटात असताना त्यांच्या आईचे सर्व सौंदर्य घेतात आणि आई निस्तेज दिसते. गोला माझ्या पोटात असताना त्याने माझे सौंदर्य घेतले नाही, त्याने त्याच्या वडिलांचे सौंदर्य आणि माझा खोडकरपणा घेतला." गोलाप्रमाणेच रुबिनानेही एका सुंदर बाळाला जन्म द्यावा अशी इच्छा आहे, असेही भारतीने सांगितले.
रुबिना दिलैकने २०१८ मध्ये अभिनव शुक्लासोबत लग्न केले होते. दोघे बिग बॉस-14 मध्ये एकत्र दिसले होते. यादरम्यान दोघांमध्ये ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर दोघांमध्ये सर्व काही मिटले आणि आता दोघेही खूप आनंदी आहेत. आता लग्नाच्या 5 वर्षानंतर ते आई-वडील होणार आहेत.