Close

क्रिस्पी पोटॅटो (Crispy Potato)

क्रिस्पी पोटॅटो


साहित्य: 250 ग्रॅम बटाटा, 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून मैदा, अर्धा टीस्पून पांढरी मिरी पावडर, 1-1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण आणि आले, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ.

ग्रेव्हीसाठी साहित्य: 1-1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण आणि आले, अर्धा टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पेस्ट, 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा टीस्पून चिली सॉस,
3 टीस्पून सोया सॉस, 1 कप पाणी, मीठ चवीनुसार, तेल.

कृती : बटाटे लांबट कापून घ्या. कॉर्नफ्लोअर, मैदा, पांढरी मिरी पावडर, लसूण, आले, मीठ आणि मिरी पावडर मिक्स करा. पाणी घालून बॅटर तयार करा. या बॅटरमध्ये बटाटे बुडवून गरम तेलात तळून घ्या.

ग्रेव्ही बनवण्याची कृती : कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला लसूण, आले, सोया सॉस, चिली सॉस, पाणी, लाल मिरची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट आणि कॉर्नफ्लोअर घाला. दोन मिनिटांनी विस्तवावरून उतरवा. तळलेल्या बटाट्यावर घालून सर्व्ह करा.

Share this article