Close

तुझ्यामुळे मी माझी ओळख गमावली… बिग बॉसच्या घरात पुन्हा अंकिता विकीमध्ये वाद (Bigg Boss 17: ‘I Have Lost My Identity… Says Vicky Jain To Ankita Lokhande In Bigg Boss)

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चा आहे. दोघेही घरात एकमेकांना साथ देताना कमी-अधिक भांडताना दिसतात. अंकिताची तक्रार आहे की विकी तिला साथ देत नाही आणि विकी म्हणतो की तो अंकिताला सतत फॉलो करू शकत नाही, तो इथे त्याचा खेळ खेळण्यासाठी आला आहे.

विक्की जैनच्या बोलण्यातूनही त्याची व्यथा मांडण्यात आली आणि लोक त्याला अंकिता लोखंडेचा नवरा ओळखत असल्याची सल त्याने व्यक्त केली. व्हिडिओत दिसते की, अंकिता विकीवर रागवून बागेच्या परिसरात बसलेली असते. तेव्हा विकीही तिथे येतो. अंकिता त्याला सांगते की ती तिच्या झोनमध्ये आहे आणि तिला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे. विकी म्हणतो ठीक आहे, तू तुझ्या झोनमध्ये रहा, तुला वाटेल तेव्हा बोल.

यावर अंकिता विकीकडे तक्रार करते की, तू ग्यानी बाबा आहेस, हा मूर्खपणा आहे. तू माझी तुलना सनासोबत करत आहे. विकी म्हणतो हे कुठून आले? अंकिता पुन्हा तक्रार करते की इथे आल्यावर मला तुझ्यापासून दूर गेल्यासारखे वाटते. इथे येऊन मी माझा जोडीदार गमावला. हे सर्व टीव्हीवर चांगले दिसते का? विकी असेही सांगतो की तो टीव्हीवरही असतो आणि त्याचा खेळ खेळतो. अंकिता तिच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल विकीला दोष देत राहते आणि म्हणते की एकतर मी माझा जोडीदार येथे गमावत आहे किंवा मी येथे स्वतःला शोधत आहे… मग विकी असेही म्हणतो की जेव्हापासून माझे लग्न झाले तेव्हापासून माझी ओळख हरवली आहे. लोक मला अंकिताचा नवरा म्हणतात.

विकी पुढे म्हणतो- मी जगात कुठेही जातो, अगदी माझ्या माणसांमध्येही मला अंकिता लोखंडेचा नवरा आला असे म्हणतात. माझ्या व्यावसायिक जगातले लोक, अगदी माझी स्वतःची माणसं, जे मला लहानपणापासून नावाने ओळखतात, मी तुझ्या इंडस्ट्रीतील लोकांबद्दल बोलत नाही... तूच विचार कर  मला कसं वाटतं? यावर अंकिता म्हणाली की ही चांगली गोष्ट आहे, तर विकीने उत्तर दिले की हा विनोद आहे, माझी ओळख गेली आहे, आता मी काय करू? ते बदलू शकत नाही, म्हणून ते मी स्वीकारले आहे.

जिग्नाही तिथे येते आणि विकीला समजावते की मी तुम्हांला बारकाईने पाहत आहे. अंकिताला लेक्चर देण्याऐवजी तिच्याशी भावनिक संपर्क साधा. तिच्या जवळ बसा, तिला मिठीत घ्या… अंकिताही जिग्नाशी सहमत असते.

Share this article