तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेला प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम पुन्हा आपल्या मायदेशी परतला आहे. या तीन दिवसांत भारत-न्यूझीलंड विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्याव्यतिरिक्त, तो बॉलिवूडचा किंग खान आणि सोनम कपूर यांच्या घरी बॉलिवूडच्या इतर कलकारांसोबत डिनर पार्टीचा भाग बनला होता, ज्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
एकीकडे शाहरुख खानने डेव्हिड बेकहॅमसोबतचा एक फोटो शेअर करून त्याचे खूप कौतुक केले आहे, तर दुसरीकडे आपल्या देशात परतल्यानंतर बेकहॅमने किंग खानसाठी आभाराची नोटही लिहिली आहे.
डेव्हिड बेकहॅमने किंग खानसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "या महान व्यक्तीच्या घरी स्वागत झाल्यानंतर मला माझा सन्मान झाल्यासारखा वाटतो. शाहरुख खान, गौरी खान, त्यांची सुंदर मुलं आणि जवळचे मित्रांसोबत डिनरचा आनंद लुटला. माझा भारताचा पहिला प्रवास संपवण्याची खास पद्धत... धन्यवाद माझ्या मित्रा - तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे माझ्या घरी कधीही स्वागत आहे."
बेकहॅमने या नोटमध्ये सोनम कपूरचेही आभार मानले आहेत. त्याने लिहिले, "सोनम कपूर आणि आनंद आहुजा, तुम्ही या आठवड्यात मला खूप प्रेमाने आणि मायेने होस्ट केले, तुम्ही तुमच्या घरी तयार केलेल्या अप्रतिम संध्याकाळबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू." बेकहॅमच्या या पोस्टवर सोनम कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
डेव्हिड बेकहॅमचे भारतात स्वागत करण्यासाठी सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी यापूर्वी डिनर पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यानंतर, किंग खानने बेकहॅमसाठी एक खाजगी पार्टी दिली, ज्यामध्ये बेकहॅमने भारतीय जेवणाचा आनंद लुटला.