Close

राहूल आणि दिशाने शेअर केले लेकीच्या बारशाचे फोटो, राहुलच्या एका फोटोने जिंकले चाहत्यांचे मन (Rahul Vaidya And Disha Parmar Share Inside Pictures From Daughter’s Naming Ceremony)

राहुल वैद्य आणि दिशा परमार त्यांच्या  पालकत्वाचा आनंद घेत आहेत. 20 सप्टेंबर रोजी या जोडप्याला मुलीचा जन्म झाला आणि 14 नोव्हेंबर रोजी दिशा-राहुलने मुलीचे नाव ठेवले.

या जोडप्याने त्यांच्या लाडक्या मुलीचे नाव नव्या असे ठेवले आहे. आता राहुल आणि दिशाने नामकरण सोहळ्याचे काही फोटो पोस्ट केली आहेत.

या फोटोंमध्ये हे जोडपे आपल्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये दोघेही त्यांच्या मुलीला किस करताना दिसत आहेत, तर काही फोटोंमध्ये राहुल दिशाला किस करताना दिसत आहे. राहुलने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे, तर दिशाने गुलाबी आणि पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे. दिशाने डोक्यात गजरा माळला आहे आणि दोघेही पारंपारिक लूकमध्ये आहेत.

मुलगी नव्या सुंदर गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये आहे, पण नव्याचा चेहरा अजून समोर आलेला नाही. यातील एक फोटो अतिशय खास आहे ज्यामध्ये दिशा तिच्या मुलीला कुशीत घेऊन आहे आणि राहुल लहानग्या नव्याच्या पायांचे चुंबन घेत आहेत. दिशाही राहुलकडे प्रेमळ नजरेने पाहत आहे.

चाहत्यांचीही या फोटोला खूप पसंती मिळत आहे आणि ते कमेंट करत या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, राहुला तिच्या पायाचे चुंबन घेताना पाहून मला माझ्या वडिलांची आठवण झाली. तू तुझ्या राजकुमारीवर खूप प्रेम करतोस.

Share this article