आलू टिक्की चाट
साहित्य: अर्धा किलो उकडलेले बटाटे, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 चमचा साबुदाणा (पाण्यात भिजवलेला), भाजण्यासाठी तूप, गोड चटणी, हिरवी चटणी आणि दही.
डाळीच्या स्टफिंगसाठी साहित्य: 100 ग्रॅम चणाडाळ (पाण्यात भिजलेली), अर्धा टीस्पून आले पावडर, 1 हिरवी मिरची, 1 टीस्पून मटार, 50 ग्रॅम पनीर, अर्धा टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे.
पद्धत: दाळ हलकी थोडे उकळवून त्यातील पाणी काढून टाका. कढईत थोडे तेल टाका. जिरे घाला. डाळ
आणि बाकीचे स्टफिंगचे साहित्य घालून 2-4 मिनिटे शिजवा.
टिक्की तयार करण्याची कृती: बटाटे कुकरमध्ये 1 शिट्टी होईपर्यंत उकडून घ्या. (जास्त उकडू नका). थंड झाल्यावर साल काढून किसून घ्या, त्यात कॉर्नफ्लोअर आणि साबुदाणा घालून हलक्या हाताने मिक्स करा. बटाटे मॅश करू नका. त्यात डाळीचा मसाला भरून तव्यावर तूप लावून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. दही, गोड चटणी आणि हिरवी चटणी सोबत सर्व्ह करा.
गोड चटणी: 100 ग्रॅम आमचूर (1 तास पाण्यात भिजवलेले), 500 ग्रॅम साखर, 1 टीस्पून मगज (खरबूजाच्या बिया), 1-1 चमचे बारीक चिरलेले काजू, खजूर आणि मनुका, 1/2 चमचा काळी मिरी पावडर, वेलची पावडर , लाल तिखट, काळे आणि पांढरे मीठ चवीनुसार.
कृती: आमचूर 10 मिनिटे मंद आचेवर उकळवा आणि नंतर गाळून घ्या. साखर मिसळा. नंतर चटणीचे इतर साहित्य घालून बारीक वाटून घ्या.