सॅम बहादूरच्या सिनेमानिमित्त अभिनेता विकी कौशल त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानिमित्त तो नुकताच भारतीय लष्कराच्या 21C 6 शीख रेजिमेंटच्या सैनिकांना भेटला. तेव्हा त्याने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एका सैनिकाने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल प्रश्न विचारला. यावर विकी कौशलने दिलेल्या उत्तरावर सगळेच हसले.
मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर या चित्रपटात विकी सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित असून, तो १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विकीने नुकतीच 21C 6 शीख रेजिमेंटची भेट घेतली. त्यावेळी एका सैनिकाने विकी कौशलला विचारले की पत्नी कतरिना कैफ व्यतिरिक्त तुझी आवडती अभिनेत्री कोण आहे. याचे उत्तर देताना विकी म्हणाला, 'पाजी, मी फक्त एका उत्तरासाठी माझ्या घरात क्लेश निर्माण करणार नाही. मला दुसरी कोणतीही अभिनेत्री दिसत नाही. माझ्यासाठी फक्त एकच आहे. माझे ध्येयही लष्करासारखेच आहे. मिशन काहीही असले तरी ते एकच राहते.
विकी कौशल पुढे म्हणाला, 'तुम्हाला पुरुष कलाकारांबद्दल विचारायचे असेल तर विचारा. बच्चन साहेब हे माझे नेहमीच आवडते आहेत आणि त्यांच्यासोबत कधीतरी काम करण्याची संधी मिळावी हे माझे स्वप्न आहे.