Close

बाल दिवसाचं औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ घेऊन येत आहे बालकांसाठी ‘बर्फाची राणी’ चित्रपट (Childrens Day Movie Snow Queen On Ultra Jhakas)

पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपण शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे.

चित्रपटाची कथा एका मोठ्या राज्यातील राजा, जादूगर आणि बर्फात बंदिस्त झालेली शापित राणी यांच्या भोवती फिरते. गेर्डा ही एका सामान्य जादूगाराच्या घरात जन्मलेली असामान्य मुलगी आहे, जिला तूर्तास तिच्यात असणाऱ्या जादुई कौशल्याचे ज्ञान नाही. राजाने राज्यातील सर्व जादूगारांना धनाचे आमिष दाखवून बर्फाच्या राणीच्या जगात बंदिस्त केले आहे, जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. त्यात गेर्डाचे आई वडील आणि भाऊही आहे. गेर्डा आपल्या कुटुंबाला सोडवण्यात यशस्वी होईल का? हे चित्रपटात कळणार आहे.
“पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ आणि बाल दिवसानिमित्त बालकांना मनोरंजनासोबतच माणूस म्हणून जगण्याची चांगली शिकवण देणारा चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.

Share this article