मोहनथाळ
साहित्य : 250 ग्रॅम बेसन, 100 ग्रॅम मावा, 150 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम तूप, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम बदाम.
कृती : कढईत तूप गरम करून त्यात बेसन सोनेरी रंगावर भाजून घ्या. त्यात कुसकरलेला मावा एकत्र करून पुन्हा थोडेसे परतवून घ्या आणि आच बंद करा. साखरेत अर्धा कप पाणी घालून एक तारी पाक तयार करा. बेसन व माव्याच्या मिश्रणात हा पाक घालून मिश्रण एकजीव करा. तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण काढा आणि पसरवून सारखे करा. त्यावर बदाम-पिस्त्याचे काप लावून सजवा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यास सुरीने चौकोनी आकाराच्या चिरा द्या. पूर्णतः थंड झाल्यावर थाळी वा ट्रेमधून बाहेर काढा.
Link Copied