बॉलिवूडची सौंदर्यवती श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर सध्या सिनेइंडस्ट्रीवर राज्य करत आहे. पण जान्हवीचं करिअऱ सुरु होण्यापूर्वीच तिच्या आईचं म्हणजेच श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यामुळे श्रीदेवीची काही खास प्रसंगी जान्हवी नेहमीच आठवण काढत असते.
सणासूदीच्या काळात तर श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवी खूप भावूक होत असते. आता दिवाळीच्या मुहूर्तावरही, अभिनेत्रीला पुन्हा तिच्या आईची आठवण झाली. आईनेच आपल्याला परंपरांची ओळख कशी करून दिली हे सांगितले.
टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, तिची आई नेहमीच खूप धार्मिक व्यक्ती होती. या सर्व परंपरांवरचा माझा विश्वास मला माझ्या आईच्या जवळचा वाटतो असे मला वाटते.
जान्हवीने सांगितले की, आई दिवाळीला स्वतः सगळी सजावट करायची. तेव्हा आम्हाला पट्टूच्या साड्याही नेसवायची. दिवाळीला आम्ही आजीच्या घरी जायचो आणि सगळे कुटुंब एकत्र जेवायचे.
दिवाळीचे जेवण नेहमी माझ्या आजीच्या घरीच होते. जेवण अप्रतिम असते. संपूर्ण घर दिव्यांनी सजवले जाते आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येते. आम्ही सर्व एकत्र चांगला वेळ घालवतो, अशा प्रकारे माझ्या कुटुंबात दिवाळी साजरी केली जाते. आमच्या ऑफिस किंवा घरात दिवसा पूजा होते. यादिवशी मी नेहमी आईला पारंपारिक पट्टू साडी नेसलेली पाहिली आहे, पूजेसाठी आम्ही पट्टू पावडई घालतो. रात्रीच्या जेवणासाठी, आम्ही आजीच्या घरी कपूर कुटुंबातील पुलाव, राजमा आणि पदार्थ खाऊन मजा करतो. कामामुळे कधी कधी रात्रीचे जेवण चुकले असेल, पण पूजा कधी चुकली नाही.
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये दिसणार आहे.