चित्रपटांमध्ये आपल्या आकर्षक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बॉलिवूडमधील अनेक टॉप अभिनेत्री लग्नानंतर आपले कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्य उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. लग्नानंतर अनेक अभिनेत्री आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत असताना, अनेक अभिनेत्री आई झाल्यानंतरही आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत अभिनयाचा प्रवासही करत आहेत. मुलींना माहेर आणि सासर असा दोन्ही घरची लक्ष्मी मानले जाते. सर्वसामान्य महिलांसोबतच अनेक बॉलिवूड सुंदरींनाही त्यांचे पती आणि सासरचे लोक लक्ष्मी मानतात.
दीपिका पदुकोण
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोणची चाहत्यांमध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे. दीपिकाचे रणवीर सिंहसोबत लग्न झाले. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रणवीर पत्नीचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. तो पत्नी दीपिकाला घरची लक्ष्मी म्हणतो.
कतरिना कैफ
बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिने २०२१ मध्ये विकी कौशलशी लग्न केले. सध्या ती त्यांचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. ती आपल्या पतीची तसेच सासरची चांगल्या सून सारखी काळजी घेते, तर पती आणि सासरचे लोकही तिला आपल्या घरची लक्ष्मी मानतात.
करीना कपूर खान
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खान ही तैमूर आणि जेह या दोन मुलांची आई आहे. पत्नी आणि आईच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच ती अभिनयातही खूप सक्रिय असते. सैफ आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि तिला आपल्या कुटुंबाची लक्ष्मी मानतो.
अनुष्का शर्मा
क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार आहे. मुलगी वामिकाच्या जन्मानंतर, अभिनेत्री चित्रपटांपासून दूर राहते. आणि तिच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करते. विराट कोहली तिला आपल्यासाठी खूप भाग्यवान मानतो त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की अनुष्कामुळे त्याचे आयुष्य बदलले आहे.
राणी मुखर्जी
अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेल्या राणी मुखर्जीला तिचा पती आदित्य चोप्रा घरची लक्ष्मी मानतो. आदित्य तिला केवळ लक्ष्मीच मानत नाही तर त्याने सर्व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार पत्नी राणीला दिले आहेत.
काजोल
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेली काजोल नीसा आणि युग देवगण या दोन मुलांची आई आहे. तिचा नवरा अजय देखील काजोल आपल्या घराची लक्ष्मी असल्याचे मानतो आणि काजोलच्या येण्याने त्याचे आयुष्य खूप बदलले. एवढेच नाही तर आपल्या यशाचे सर्व श्रेय तो काजोलला देतो. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)