Close

दिवाळी. स्पेंशल: नारळाचे लाडू (Coconut Ladoo)

नारळाचे लाडू


साहित्य : दीड कप नारळाचा चव (डेसिकेटेड कोकोनट), दोन तृतीयांश कप साखर, अर्धा कप पाणी, 3-4 वेलच्या.

कृती : पाण्यात साखर विरघळवून घ्या. नंतर गाळून मंद आचेवर गरम करत ठेवा. साखरेचा एक तारी पाक तयार करा. नंतर आच बंद करून त्यात लगेच नारळाचा चव व वेलची पूड एकत्र करा. या मिश्रणाचे लहान-लहान लाडू वळून घ्या. एका ताटामध्ये थोडा नारळाचा चव घेऊन, त्यात हे लाडू हळुवार घोळवून घ्या.

टीप : नारळाच्या चवमध्ये गरजेनुसार कंडेंस्ड मिल्क एकजीव करून मऊसर पीठ तयार करा. या पिठाचे लाडू वळून सुक्या नारळाच्या चवामध्ये घोळवून घ्या. असे हे झटपट नारळाचे लाडूही चविष्ट होतात.

Share this article