Close

शिक्षणावर भाष्य करणाऱ्या सलमान सोसायटी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च (Trailer Of Marathi Film ‘Salman Society’ Launched : Film Criticises Education System)

सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि ती लोकांच्या पसंतीसही उतरलीत. आज चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडिया वर रिलीज करण्यात आला आहे.

ट्रेलर मध्ये खूप इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीची ही किनार आहे. हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांवर भाष्य करतो. एकूण हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. ट्रेलर मध्ये लहानग्यांची शिक्षणासाठीची धड़पड़ लक्ष वेधून घेते.

दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे की ह्या भटक्या, अनाथ मूलांची व्यथा सर्वांसमोर यावी आणि हया वर प्रबोधन होऊनी मुलांना योग्य ते शिक्षण मिळावे.

अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत ‘सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे .

https://youtu.be/_AFZu4vNycg?si=-Rh0BkcGbNgfAWSE

'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यानि दिले असुन डीओपी फारूक खान आहेत. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Share this article