आमिर खानची मुलगी आयरा खान अनेक वर्षांपासून तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. गेल्या वर्षीच त्यांचा साखरपुडा पार पडला. आता त्यांच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अलीकडेच आयराने तिच्या इंस्टाग्रामवर केळवणाच्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत.
आयराने आपल्या इंस्टाग्राम फॉलोअर्सना तिच्या केळवण सोहळ्यातील काही क्षण दाखवून आपला आनंद शेअर केला. फोटोत आयरा खान आणि तिचा होणारा नवरा नुपूर शिखरे केळवणमध्ये व्यस्त दिसत आहेत. या कार्यक्रमाला त्यांचे कुटुंब आणि मित्रमंडळी दोघेही उपस्थित होते. पण यावेळी आमिर खान उपस्थित नव्हता.
केळवण समारंभ पारंपारिक महाराष्ट्रीयन विवाहसोहळ्यात केला जातो. या परंपरेत, वधू आणि वराचे पालक एकमेकांच्या कुटुंबांना जेवणासाठी आमंत्रित करतात. दोन्हीकडून काही भेटवस्तूही दिल्या जातात. दोन्ही बाजूंच्या जवळच्या नातेवाईकांना देखील बोलावले जाते.
आयरा आणि नुपूर २०२४ मध्ये विवाहबंधनात अडकतील. नुपूरने आयराला तिच्या कठिण काळात साथ दिली होती. त्यामुळे आमिरला सुद्धा आपल्या भावी जावयाचा खूप अभिमान आहे.