पावभाजी
साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 1-1 बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, 250 ग्रॅम उकडलेले हिरवे वाटाणे, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, 1-1 टीस्पून लाल मिरची पावडर, लसूण पेस्ट, किसलेले आले, आमचूर पावडर, अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, आवश्यकतेनुसार बटर, चवीनुसार मीठ, पाव. कृती : फ्राईंग पॅनमध्ये बटर गरम करा. चिरलेला कांदा घालून परता. टोमॅटो आणि सर्व मसाले घालून 3-4 मिनिटे शिजवा. अर्धा कप पाणी घालून एक-दोन मिनिटे उकळा. बटाटे, मटार आणि हिरवी मिरची घाला. मीठ घालून थोडा वेळ शिजवा. पाव बटरने भाजून घ्या. भाजी, रायता, कांदा टोमॅटो सॅलाड आणि लिंबाचा तुकड्यासोबत पाव सर्व्ह करा.
Link Copied