Close

अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन लग्न होऊनही एकत्र राहत नाही! अभिनेत्रीने बिग बॉसच्या घरात केला खुलासा  (Ankita Lokhand Reeveals She And Vicky Jain Does Not Live Together)

पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला तेव्हापासून ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दोघेही बिग बॉसच्या घरात बहुतेक वेळा भांडत असतात. अंकिता लोखंडेने आता आणखी एक खुलासा केला आहे की ती आणि तिचा नवरा एकत्र राहत नाही.

बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर या जोडप्याच्या चाहत्यांना घरामध्ये दोघांचा रोमान्स पाहायला मिळेल असे वाटत होते. मात्र घरात आल्यापासून दोघेही एकमेकांशी नुसते भांडत आहेत. विकी सतत अंकिताचा अपमान करण्यात मग्न असतो.

अंकिता लोखंडेने खुलासा केला आहे की, तिचे आणि विकीचे लग्न होऊन बराच काळ झाला आहे, तरीही दोघेही एकत्र राहत नाहीत.

ETimes शी केलेल्या संभाषणात अभिनेत्रीने बिग बॉसच्या घरात जाण्याचे कारण सांगितले. अंकिताने सांगितले होते की, शोमध्ये जाण्याचे काही खास कारण नाही, पण यावेळी मी शोमध्ये जाण्याचा विचार केला. जर मी माझा पती विकीसोबत बिग बॉसच्या घरात जाणार असेल तर तो मला सपोर्ट करेल आणि माझी ताकद बनेल.

अंकिताने सांगितले की, तिचे आणि विकीचे लग्न होऊन बराच काळ झाला आहे, तरीही दोघेही एकत्र राहत नाहीत. विकी त्याच्या व्यवसायामुळे बिलासपूरमध्ये राहतो. दोन्ही शहरात तो ये जा करत असतो. आम्हाला हनिमूनशिवाय जास्तीत जास्त 20 दिवसांपेक्षा जास्त वेळ एकत्र राहण्याची संधी मिळाली नाही. पण यावेळी मला एकत्र राहण्याची संधी मिळाली आहे.

Share this article