बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने काल तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. वाधदिवस साजरा करण्यासाठी अनन्या मालदीवला गेली आहे. काल अभिनेत्रीने तिच्या मालदीवच्या सुट्टीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे, जिथे अनन्या पांडे तिचा कथित प्रियकर आदित्य रॉय कपूरसोबत तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, अनन्या पांडे आणि तिचा कथित प्रियकर आदित्य रॉय कपूर काल मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. पण मीडियाची तीक्ष्ण नजर टाळण्यासाठी दोघेही वेगळे स्पॉट झाले. तेव्हापासून, लव्ह बर्ड्सचे चाहते असा अंदाज लावत होते की अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर सुट्टीवर जात आहेत.
२५व्या वाढदिवसानिमित्त अनन्या पांडेने आज तिच्या चाहत्यांना एक शानदार ट्रीट दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या मालदीव व्हेकेशनच्या काही झलक तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.
तिच्या हॉटेल रूम आणि सुंदर स्विमिंग पूलची ही छायाचित्रे शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - वाढदिवसाच्या दिवशी परफेक्ट मॉर्निंग. अभिनेत्रीने पॅनकेक्स आणि स्ट्रॉबेरीसह नाश्त्याचा फोटो देखील शेअर केला आहे.
अनन्याने शेअर केलेल्या बर्थडे सेलिब्रेशनच्या या फोटोंमध्ये आदित्य रॉय कपूर कुठेही दिसत नाही. तिच्या वाढदिवसानिमित्त सुंदर जागा, स्वादिष्ट नाश्ता आणि तिच्या खोलीतील प्रियकराची संगत हे सूचित करते की अभिनेत्रीला तिचे नाते गुप्त ठेवायचे आहे.