Close

‘हास्यजत्रा’ फेम विनोदवीर गौरव मोरे आता ‘सलमान सोसायटी’ चित्रपटात (‘Maharashtrachi Hasyajatra’ Fame Gaurav More Plays A Key Role In Marathi Film ‘Salman Society’)

'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एक गाणे लॉन्च करण्यात आले आहे. 'पार्टी दणाणली...' असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत करत आहेत. 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर चित्रपटाची कथा आधारित आहे. 'पार्टी दणाणली' हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे. अमित बाइंग ने कोरियोग्राफ केले आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

बाल कलाकार पुष्करने या आधी 'एलिझाबेथ एकादशी', 'बाजी', 'रांजण', 'चि .व चि .सौ. का', 'फिरकी' आणि 'टी. टी. एम. एम' झोंबीवली चित्रपटात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी चित्रपट 'रईस'मध्ये बालपणीच्या शाहरुख़ खानची भूमिका बजावली. तसेच 'हाफ टिकिट', 'फास्टर फेणे' जर्नी सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने 'हाफ टिकिट', 'ताजमहल' आणि 'येरे येरे पावसा, माउली'मध्ये भूमिका केल्या आहेत. ‘पार्टी दणाणली’ हे गाणे रसिकांना भुरळ पाडेल हे नक्की आहे. आता उत्सुकता आहे चित्रपटाच्या ट्रेलरची जो लवकरच प्रदर्शित होईल. प्रजक्ता एंटरप्राइजेस आणि विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होत असुन म्यूजिक वीडियो पॅलेसवर उपलब्ध आहे.

Share this article