Close

पहिला करवा चौथ साजरा करण्यासाठी कियारा अडवाणी निघाली सासरी (Kiara Advani Heads To Delhi With Sidharth Malhotra For First Karwa Chauth)

बॉलिवूडचे गोड जोडपे कियारा आणि सिड हे सर्वांचे लाडके आहेत. या दोघांचा जैसलमेर पॅलेसमध्ये 7 फेब्रुवारीला शाही विवाह झाला. लग्नानंतर दोघांची केमिस्ट्री सार्वजनिक ठिकाणी अनेकवेळा दिसली आहे. दोघेही खूप प्रेमात आहेत.

कियारा आता तिचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहे. त्यासाठी सिड आणि कियारा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते.

दोघेही कूल लूक आणि रोमँटिक अंदाजात दिसले. यावेळी कियाराने कॅपसह पांढरा टॉप आणि डेनिम्स परिधान केले होते, तर सिडने क्रीम रंगाची हुडी आणि पँट घातली होती.

आता प्रत्येकजण कियाराच्या करवा चौथ सेलिब्रेशनच्या फोटोंची आणि तिच्या लूकची वाट पाहत असेल. पहिला करवा चौथ खास आहे, सिडने कियाराला एक सुंदर भेट देण्याचा विचार केला असेल.

Share this article