टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय स्टँडअप-कॉमेडियन जोडपे सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आणि आता गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर, या जोडप्याने त्यांच्या जवळच्या मित्रांसह आणि कुटुंबातील सदस्यांसह डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला.
कॉमेडीयन जोडपे सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांनी त्यांच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे कपल एकमेकांसोबत मस्ती करताना आणि मजा करताना दिसत आहे. बर्फी-पेडा, ओट-भरणी आणि धनुष्यबाण अशा सर्व विधींनी महाराष्ट्रीय प्रथेनुसार डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात फन गेम्सचेही आयोजन करण्यात आले होते - कोण प्रथम डायपर बदलेल, ज्यामध्ये सुगंधा जिंकली. या जोडप्याने एकत्र एक युगल गीतही गायले. हे युगल गीत सुगंधा मिश्राने लिहिले आहे. नया मेहमान आनेवाला है असे या गाण्याचे शीर्षक आहे.
या समारंभात, संकेतने देखील आपला आनंद आणि भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला – मी खूप आनंदी आहे. आम्ही खूप मजा केली. सुगंधाला बेबी शॉवरच्या विधी दरम्यान हसताना आणि पार्टीचा आनंद घेताना पाहून खूप आनंद झाला. आता देवाच्या आशीर्वादाने आम्ही बाळाच्या लवकर येण्याची वाट पाहत आहोत.
बेबी शॉवरच्या फोटोंपूर्वी सुगंधाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी काही सुंदर फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत बेबी बंप दाखवताना दिसत आहे.