बंध रेशमाचे, छोटी मालकीण, स्वाभिमान या स्टार प्रवाहच्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या नव्या मालिकेत अक्षर अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. अद्वैत बिझनेस मॅन आहे. वडिलोपार्जित चालत आलेला सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस तो एकटा सांभाळतो. बिझनेसशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. तो जे पारखून घेईल त्यात चूक शोधूनही सापडणार नाही. हे नवं पात्र साकारण्यासाठी अक्षर फारच उत्सुक आहे.
Link Copied