प्रियांका चोप्राने ती मुंबईत परतत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. गुरुवारी रात्री ती विमानतळावर दिसली. अभिनेत्रीने मीडियाला हात जोडून अभिवादन केले आणि फोटो सुद्धा काढले. यावेळी अभिनेत्री आरामदायी लूकमध्येही स्टायलिश दिसत होती. प्रियांका चोप्राने ब्रॅलेट टॉपसह राखाडी पँट घातली होती आणि लांब काळ्या जॅकीटसह लूक स्टायलिश केला होता.
प्रियांका चोप्रा मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मात्र, यावेळी अभिनेत्रीच्या गळ्यातील पेंडंटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या नावाचे पेंडेंट घातले होते. पेंडंटमध्ये मालती लिहिले होते. यावरून प्रियांका आपल्या मुलीवर किती प्रेम करते हे दिसून येते.
भारतात येताना प्रियांका चोप्राने तिच्या फ्लाइट तिकीट आणि पासपोर्टची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती आणि माहिती दिली होती की ती Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात परतत आहे. यासोबत अभिनेत्रीने लिहिले होते, " एक मिनिट झाला मुंबई, मी थांबू शकत नाही."
परत येताच प्रियांकाने इंस्टाग्राम अकाऊंटवर मुंबईच्या रस्त्यांवर फिरतानाची एक स्टोरी शेअर केली.
प्रियांका चोप्रा शेवटची 'लव्ह अगेन' आणि 'सिटाडेल' वेब सीरिज मध्ये दिसली होती. 'हेड्स ऑफ स्टेट्स' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू' हे तिचे आगामी चित्रपट आहेत, ज्यासाठी अभिनेत्री शूटिंग करत आहे.