गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती के सीझन 15' चे सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये ते अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. एका एपिसोडमध्ये त्यांनी 'नमक हलाल' चित्रपटातील 'पग घुंघरू' या हिट गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगत त्यांची प्रकृती कशी बिघडलेली ते सांगितले.
शोमध्ये, अमिताभ यांनी स्पर्धकांसोबत एक मजेदार किस्सा शेअर केला. त्यात त्यांनी सांगितले. 'नमक हलाल' मधील 'पग घुंगरू' या हिट गाण्याच्या शूटिंगचा काळ आठवला. शोमध्ये बिग बी एका प्रश्नावर एका गाण्याचा ऑडिओ वाजवतात, जे त्यांच्या 'नमक हलाल' चित्रपटातील 'पग घुंघरू' हे लोकप्रिय गाणे होते.
गाण्याची ऑडिओ क्लिप थांबल्यानंतर, अमिताभ गाण्याच्या शूटिंगच्या कठीण काळाची आठवण सांगतात. गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांची प्रकृती खूपच खराब झाली होती. ते म्हणाले की, शूटिंगदरम्यान आमची अवस्था इतकी वाईट झाली होती की ती आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही.
मला नृत्य किंवा वाचन कसे करावे हे माहित नाही आणि हे खरे आहे. आमच्या नृत्य शिक्षकांनी आम्हाला काठीने मारुन नृत्य शिकवले होते. नृत्य शिकवताना ते म्हणायचे, हे कर, ते कर, जे करताना माझी अवस्था बिकट झाली.
'नमक हलाल' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. प्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत शशी कपूर, स्मिता पाटील, परवीन बाबी, रणजीत आणि ओम प्रकाश यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट नक्कीच सुपरहिट ठरला, पण या चित्रपटातील 'पग घुंगरू' हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले.